परिचय
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित ची स्थापना १ मे १९७४ रोजी झाली. सुरुवातील ५ कोटी रु. असलेले शासकीय भाग भांडवल जी.आर.क्रं. १०९७/१३१५४/एससीपी-२ नुसार दि. १० मार्च १९९८ पर्यंत ५० कोटींपर्यंत वाढले. ३१ मार्च २००७ पर्यंत लिडकॉम चे शासकीय भाग भांडवल ७३.२१ कोटी रु. एवढे आहे.राज्य शासनाचा भाग भांडवलात १००% हिस्सा आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय क्रं. लिड/ १०९५/६४६१/आयएनडी-५ नुसार, लिडकॉम ला उद्योग विभागकडून समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. चर्मोद्योगाच्या विकासात कार्यरत असणाऱ्या समुदायास आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.